Skip to content
+91- 9623176999
ravipatilchaudhari999@gmail.com
great_village-300x120
Menu

About Us

Agri Tourism Center

ग्रेट व्हिलेज म्हणजेच ग्रीन राईज इको ॲग्री टुरिझम . पुण्यापासून अवघ्या 45 किलोमीटरवर राजगुरुनगर शहराजवळील खरपुडी बुद्रुक येथे भीमानदी काठावरील निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच ग्रेट व्हिलेज. या ठिकाणी पर्यटकांना शेतावरील फेरफटका, ग्रामीण संस्कृतीची ओळख आणि आनंद मिळतो. शहरी जीवनशैलीचा उबग आलेले लोक या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन निखळ आनंद लुटत असतात. विविध शाळांच्या सहलीही या ठिकाणी येत असतात. या ग्रेट व्हिलेज कृषी पर्यटन केंद्रात विद्यार्थ्यांना शेतीची माहिती, झाडांची माहिती, बैलगाडी सफर, ट्रॅक्टर, बॅरल ट्रेन , आधी साधनांचा वापर असतो. या ठिकाणी असलेले झोके, घसरगुंड्या, साहसी खेळ, निसर्ग संपदेचा अनोखा आविष्कार, गर्द दाट झाडी, स्वच्छ शुद्ध मोकळी हवा व अस्सल ग्रामीण जेवणाचा मनमुराद आनंद लुटत असतात. या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हे कृषी पर्यटन केंद्र वरदानच आहे आणि सुट्टीची धमाल असणारे हे ठिकाण आहे. झुलता पूल, चिल्ड्रन प्ले पार्क, रेन डान्स, पशुपक्षी उद्यान, तसेच औषधी वनस्पती, निशिगंधा, लिली, आंबा, साग, चिंच, जांभूळ, संत्री, मोसंबी, सफरचंद, आवळा, फणस, नारळ, सुपारी अशा असंख्य प्रकारच्या वृक्षांनी नटलेले हे ठिकाण आहे. शालेय सहली, बर्थडे सेलिब्रेशन, फॅमिली पिकनिक, बारसे, गेट-टुगेदर, प्री-वेडिंग यासाठी योग्य ठिकाण म्हणजेच ग्रेट व्हिलेज.

एक वेळ अवश्य भेट द्या व अनुभवा ग्रामीण जीवनशैली व शेतातील मौजमस्ती. या कृषी पर्यटन केंद्राला पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांची मान्यता आहे .भीमानदी काठावरील निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच ग्रेट व्हिलेज

kl
hj